Latest

President Election : आपचा यशवंत सिन्हांना पाठिंबा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रपती निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती आपचे खासदार संजय सिंग यांनी दिली आहे.

एएनआयने याबाबतचे ट्विट प्रसिद्ध केले आहे, खासदार संजय सिंग म्हणाले, आप विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा. आम्ही द्रौपदी मुर्मूंचा आदर करतो मात्र आम्ही यशवंत सिन्हा यांना मतदान करू.

राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलैला होणार असून 21 जुलैला मतमोजणी आहे. निवडणुकीसाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली असून विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुर्मू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत त्यांना शिवसेना, अकाली दल, तेलगू देसम पार्टी, बसपा, निजद आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांना पाठिंबा दिला जात असल्याचे वरील पक्षांकडून सांगितले जात आहे. मुर्मू यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांची बाजू मात्र कमकुवत बनली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या बाजुने मतदान करायचे, यावरुन कॉंग्रेस, सपा मध्ये फूट पडलेली आहे तर तृणमूल काँग्रेसदेखील सध्या कोड्यात पडली आहे.

सात विरोधी पक्षांचा पाठिंबा प्राप्त झाल्याने मुर्मू यांना पडणाऱ्या संभाव्य मतांची संख्या साडेसहा लाखांच्या समीप पोहोचली आहे. विशेष म्हणजे निवडणूक लागण्यापूर्वी रालोआकडे असलेल्या मतांची संख्या 5 लाख 26 हजार 420 इतकी होती. मुर्मू यांना विजयासाठी त्यावेळी 13 हजार मते कमी पडत होती. तथापि विरोधी पक्षांत पडलेल्या फुटीमुळे मुर्मू यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांचे समर्थन मिळाले असले तरी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याइतपत मते मिळण्याची शक्यता कमी आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत कोविंद यांना तब्बल 7.2 लाख मते पडली होती.

वाचा संबंधित बातम्या:

SCROLL FOR NEXT