पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात १८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक (President Election 2022) होत आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichukale) यांनी मी देशातील खासदार, आमदार यांच्याशी बोलत असून, राष्ट्रपती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा खुलासा केल्याने, या निवडणुकीत बिचुकले यांच्या येण्याने वेगळीच रंगत येणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रपती निवडणुकीच्या (President Election 2022) रणांगणात विरोधी पक्षांसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावं पुढे येत आहेत. अशातच बिग बॉसमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले अभिजीत बिचकुले हे नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी चर्चेला आले आहे. त्यांनी स्वत: आपण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. यापूर्वी अभिजीत बिचकुले यांनी आमदारकी, खासदारकी आणि राष्ट्रपतींची निवडणूक लढवली आहे.
अभिजीत बुचकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, हे सत्य आहे की मी राष्ट्रपती निवडणुकीसाठी इच्छुक आहे. सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी माझी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले.