नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबमध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने (aap) यावेळी मोठा विजय मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले. काँग्रेस आणि अकाली दलाच्या मातब्बर नेत्यांना धक्का देत आपने हे सिद्ध केले आहे की, पंजाबच्या जनतेने दिल्ली मॉडेल स्वीकारले आहे. पंजाबमध्ये विजय मिळवल्यामुळे देशातील दोन राज्यात सत्ता स्थापन करणारे आप एकमेव प्रादेशिक पक्ष ठरला आहे. पंजाबही पहिले राज्य ठरले आहे, जिथे आपला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.
आपने पंजाबच्या राजकारणात २०१४ मध्ये प्रवेश केला. चंडीगढ नगर महापालिका निवडणूक आपने लढवली होती. या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून आप समोर आला होता. यावर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही निवडणूक म्हणजे आगामी पंजाब विधानसभेची नांदी असल्याचे म्हटले होते. तसेच आपही पंजाबमध्ये बदल घडवून आणू शकतो. हे त्यांचे विधान आता खरे ठरले आहे.
आपला २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २० जागा मिळाल्या होत्या. आप दुसरा मोठा पक्ष ठरला होता. आपने २०१७ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नांव जाहीर केले नव्हते. त्यावेळी पक्षाने लोकांची मते आजमावून पाहिले होते. त्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी जनतेकडून मते मागवली होती. त्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. परंतु, जनतेने चन्नी यांना साफ नाकारून टाकले.
पंजाबमध्ये आपने जनतेला अनेक आश्वासने दिली होती. ज्यामध्ये ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मोफत शिक्षण, महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पैसे टाकणार, आरोग्य सेवा मोफत देणार, अशीही आश्वासने दिली होती. तसेच दिल्लीच्या धर्तीवर १६ हजार मोहल्ला रूग्णालये सुरू करणार असल्याचे वचन दिले होते.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : "महिलांनी राजकारणात आलं पाहिजे" – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women's Day 2022