पुढारी ऑनलाईन डेस्क : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपने शुक्रवारी दिल्लीत जोरदार निर्देशने सुरु केली आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या निदर्शनादरम्यान दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी दिल्लीतील आयटीओ येथे ताब्यात घेतले. Arvind Kejriwal Arrest updates |
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर तैनात केलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलत असताना डीसीपी सेंट्रल एम हर्ष वर्धन म्हणाले, "आम्ही विशेषत: न्यायालयाच्या आसपासच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. डीडी मार्गावर कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कारण इथे महत्वाची कार्यालये आहेत.
हेही वाचा