Latest

Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार अयोध्या दौरा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मनसेच्या हिंदूत्वाच्या आक्रमक भुमिकेनंतर शिवसेनेने अयोध्या दौरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाशिकच्या दौऱ्यातील बैठकीमध्ये हे नियोजन करण्यात आले आहे. मनसेने हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेच्या हिंदूत्ववादावर आक्रमक भुमिका घेतली. याच भुमिकेविरूद्ध आता शिवसेनेने मे महिन्याच्या सुरूवातीला अयोध्या दौरा नियोजित केलेला आहे.

लाऊडस्पीकरच्या वादावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीवरून ठाकरे कुटुंबावर राजकीय वातावरणाचे पडसाद दिसून येत आहे. मशिदींवरील भोंग्यावर आता महाराष्ट्रात हिंदूत्ववादी भुमिकांचे राजकारण तापत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांचा पुतण्या आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देखील दिले होते. महाराष्ट्र सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लाऊडस्पीकरऐवजी वाढत्या महागाईचा मुद्दा उपस्थित करावा, असा टोला देखील काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना लगावला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT