बरं ते नव्हं…कोल्हापूर उत्तरमध्ये करुणा मुंडेंना किती मते पडली? | पुढारी

बरं ते नव्हं...कोल्हापूर उत्तरमध्ये करुणा मुंडेंना किती मते पडली?

कोल्हापूर,  पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकची मतमोजणी आज (शनिवार) झाली. या मतमोजणीत कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव केला. तर या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अपक्ष उमेदवार करूणा धनंजय मुंडे यांना  केवळ १३३ मते मिळाली आहेत. दरम्यान  सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी कोणत्याही मतदारसंघात तुला ओळखणार नाही, अशी टीका करूणा मुंडे यांच्यावर केली होती. या टीकेला त्यांनी अनोळखी मतदारसंघात उभे राहत १३३ मते मिळवत उत्तर दिले आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक मतमोजणीत आत्तापर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा कोल्हापूरच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूकी संदर्भात त्याच्याशी संवाद साधला असता, कॉंग्रेस, भाजपाकडून आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणुक रद्द करण्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

या निवडणूकीत 40 लाख रुपये खर्च करत, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माझ्याकडे या प्रकरणी पुरावा असल्याचे त्या म्हणाल्या.  याप्रकरणी निवडणुक आय़ोगात तक्रार नोंदवली असून, त्यावर काहीच कारवाई न केल्यामुळे करुणा मुंडे यांनी यावर आक्षेप नोंदवला. याप्रकरणी मी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचलत का ?

Back to top button