Latest

Plane Crash in US : अमेरिकेत विमान अपघातात भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या विमान अपघातात भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला असून तिची मुलगी गंभीर जखमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे एक चाचणी विमान होते, त्यामध्ये फक्त महिला, तिची मुलगी आणि पायलट होते. रोमा गुप्ता (वय 63) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगी रिवा गुप्ता (वय ३३) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान जेव्हा लॉंग आयलँड होम्सवरून उड्डाण करत होते तेव्हा पायलटला विमानातून धूर निघताना दिसला. यानंतर त्याने तत्काळ जवळच्या रिपब्लिक विमानतळाला याची माहिती दिली. मात्र, विमानतळावर पोहोचेपर्यंत विमानाने पेट घेतला. त्यात रोमा गुप्ता यांचा मृत्यू झाला तर मुलगी आणि पायलट गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रीवाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात झालेले विमान चार आसनी व एक इंजिन असलेले पाईपर चेरोकी विमान होते. न्यूयॉर्कच्या रिपब्लिक विमानतळावरून विमानाने उड्डाण केले होते. हे विमान डॅनी विजमन फ्लाइट स्कूलचे होते. फ्लाइट स्कूलच्या वकिलांनी सांगितले की, अपघात झालेल्या विमानाने नुकत्याच सर्व चाचण्या पूर्ण केल्या होत्या. अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत महिलेच्या कुटुंबासाठी ६० हजार डॉलर्सचा निधी उभारण्यात आला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT