PM Modi on Budget Webinar : जगात RuPay आणि UPI ही भारताची ओळख, PM मोदींचे इंडिया इंकला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन

PM Modi on Budget Webinar : जगात RuPay आणि UPI ही भारताची ओळख, PM मोदींचे इंडिया इंकला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पावरील 10 व्या वेबिनारला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया इंकला गुंतवणूक वाढवण्याचे आणि 2023-24 च्या अर्थसंकल्पात अनावरण केलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RuPay आणि UPI सह अन्य आर्थिक मुद्द्यांवर संबोधन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत डिजिटल चलनात पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी, भारताने UPI द्वारे 75,000 कोटी रुपये हस्तांतरित केले, यावरून हे सिद्ध होते की RuPay आणि UPI हे केवळ कमी किमतीचे आणि अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान नाही, तर ती जगात आपली ओळख आहे. तसेच सरकारने भांडवली खर्चावरील खर्च 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, भारताकडे अशी प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि नवसंशोधक आहेत जे आपल्या आर्थिक व्यवस्थेला शीर्षस्थानी नेऊ शकतात. इंडस्ट्री 4.0 च्या युगात, भारत जे प्लॅटफॉर्म तयार करत आहे ते जगासाठी एक मॉडेल बनत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या वेबिनारमध्ये पीएम मोदींनी खासगी क्षेत्रालाही यावेळी आवाहन केले आहे. ते म्हणाले, "देशातील खाजगी क्षेत्रालाही मी सरकारप्रमाणेच गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन करेन, जेणेकरून देशाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल."

PM Modi on Budget Webinar : कर भरणे राष्ट्र उभारणीसाठी एक कर्तव्य

कर संबंधी बोलताना ते म्हणाले, भूतकाळा पेक्षा आता जीएसटी, आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात यामुळे भारतात कराचा बोजा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. यामुळे कर संकलन चांगले झाले आहे, असे ते म्हणाले. 2013-14 मध्ये एकूण कर महसूल सुमारे 11 लाख कोटी रुपये होता जो 2023-24 मध्ये 200 टक्क्यांनी वाढून 33 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. वैयक्तिक कर परताव्यांची संख्या 2013-14 ते 2020-21 पर्यंत 3.5 कोटींवरून 6.5 कोटी झाली आहे.

"कर भरणे हे एक असे कर्तव्य आहे, ज्याचा थेट संबंध राष्ट्र उभारणीशी आहे. कर बेसमध्ये वाढ हा लोकांचा सरकारवर विश्वास असल्याचा पुरावा आहे आणि भरलेला कर लोकहितासाठी खर्च केला जात आहे, असा त्यांचा विश्वास आहे," असे मोदी म्हणाले.

PM Modi on Budget Webinar : Rupay आणि UPI जगात आपली ओळख

RuPay आणि UPI हे केवळ कमी किमतीचे आणि अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान नाही, तर जगात आपली ओळख आहे. नवनिर्मितीला प्रचंड वाव आहे आणि UPI हे संपूर्ण जगासाठी आर्थिक समावेश आणि सक्षमीकरणाचे साधन बनले पाहिजे, त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. मोदींनी सुचवले की वित्तीय संस्थांनीही त्यांची पोहोच वाढवण्यासाठी फिनटेकशी जास्तीत जास्त भागीदारी करावी.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news