Latest

बेळगाव : संकेश्वरचा बेपत्ता मुलगा दिल्लीत सापडला

अविनाश सुतार

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : संकेश्वर येथून मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला १५ वर्षीय मुलगा शेवटी दिल्ली रेल्वे स्टेशनवर सापडला आहे. संकेश्वर शहरातील मुस्ताक मकानदार यांचा इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा सुफीयान मुस्ताक मकानदार (वय १५) हा दि ९ नोव्हेंबर रोजी शाळेला जातो म्हणून सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर घरी परतला नसल्याने पालकांनी शिक्षकांशी संपर्क साधला असता तो शाळेत नसल्याचे कळले. दरम्यान, सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो तिथेही नसल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. पण कोठेही मिळत नसल्याने सर्वजण चिंतेत होते. पण काल अचानक सुफियाचा आपण दिल्ली रेल्वे स्टेशनवर असल्याचा फोन आला. यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. वडिलांनी लागलीच करोशी येथील व सध्या दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले इम्रान हैदर मुल्ला यांना फोनवरुन याबद्दल माहिती दिली.

इम्रान यांनी लागलीच रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीन चालकाशी संपर्क साधून रेल्वे पोलिसांना याची कल्पना देऊन आपण येण्यापर्यंत त्या मुलाला आपल्याजवळ ठेऊन घेण्यास सांगितले. काही वेळात मुल्ला रेल्वे स्थानकावर पोहचून रेल्वे पोलिसांना आवश्यक माहिती व ताबा पत्र देऊन सुफीयानला आपल्या घरी घेऊन आले.

काल (दि.१५) सुफीयानचे आई वडील व नातेवाईक तसेच माजी सैनिक इमरान मांजरेकर यांनी दिल्ली गाठली. यावेळी आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुफीयानला पाहून पालकांना व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. यावेळी सुफियाने तो कसा दिल्लीला पोहचला हे सांगितले. आपण रेल्वेने अजमेरला गेलो होतो. तेथे अजमेर ख्वाजा दर्ग्यात दर्शन घेऊन परत रेल्वेने दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरलो. यावेळी त्याने तेथील एका व्यक्तीचा मोबाईल मागून घेऊन घरी फोन केला.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT