बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बंद घरे फोडणार्या जोडगोळीला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दिड किलो सोन्याचे दागिने व साडेचार किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यांनी एकूण 22 घरफोड्या केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
प्रकाश पाटील (वय 37, मूळ रा. वडगाव, सध्या रा. साखळी-गोवा) व महेश रामा काळगीनकोप्प (वय 37, रा. खानापूर, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 75 लाखांचे दिड किलो सोन्याचे दागिने, 3 लाखांच्या साडेचार कि. चांदीच्या वस्तू व 1 लाख 80 हजारांची दुचाकी असा 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रकाश हा घर हेरून महेशला माहिती देत होता. महेश घराचे लॉक तोडत असे, तर प्रकाश घराबाहेर थांबून कोणी येत तर नाही ना, यावर पाळत ठेवत असे. कुलुप तोडल्यानंतर दोघे मिळून घरात शिरून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लुटून नेत असते.