Latest

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अनुराधा कोरवी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा:  धरणगाव शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील संशयितास अटक करण्यात आली आहे.

चोपडा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील एका भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १७ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी ही चोपडा येथे आपल्या आई-वडिलांसह आली होती. त्यावेळी संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील (रा.संजय नगर धरणगाव) याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले होते. त्यानंतर गुजरात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT