विजयवाडा; पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांनी YouTube व्हिडिओच्या मदतीने लिंग पुनर्असाइनमेंट शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्रजनन अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया गुरुवारी नेल्लोर येथील एका खासगी हॉटेलमध्ये कोणतीही वैद्यकीय खबरदारी न घेता आणि पात्र वैद्यकीय व्यावसायिकाच्या देखरेखीखाली पार पडली. याप्रकरणी बीफार्माच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडितला त्याचे लिंग बदलायचे होते. यादरम्यान तो सोशल मीडियावर बी फार्माच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्यांनी त्या तरुणाला त्याच्या शब्दात गोवले आणि त्याच्यावर अत्यंत कमी खर्चात लिंग बदलणारी शस्त्रक्रिया करू असे आश्वासन दिले.
पोलिसांनी सांगितले की, कामेपल्ली गावातील पीडितचा मृत्यू जास्त रक्तस्त्राव आणि रक्त थांबवण्यासाठी दिलेल्या औषधांच्या ओव्हरडोजमुळे झाला. ज्या खोलीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली ती खोली अस्वच्छ असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाचा मृत्यू होताच विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. खोलीत मृतदेह आढळल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना मृत्यूची माहिती मिळाली.
पीडित हैदराबादमध्ये रोजंदारीवर काम करत होता. २०१९ मध्ये, त्याचे त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. मात्र, वर्षभरातच २०२० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर तो प्रकाशम येथे राहायला गेला, जिथे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून विशाखापट्टणममधील एका ट्रान्सजेंडरच्या संपर्कात आला. दोघेही आरोपींसोबत व्हॉट्सअॅपवर नियमित चॅट करत होते.
पीडितने मुंबईत लिंग पुनर्असाइनमेंट शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा विद्यार्थ्यांनी शस्त्रक्रिया कशी करायची हे माहित असल्याचे सांगितले. अतिशय कमी खर्चात तिची शस्त्रक्रिया करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्याला मुंबईत डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यास राजी केले.
हे ही वाचलं का ?