Latest

Thane : ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

backup backup

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले असून, याबाबत ठाणे जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी संपर्क साधला आहे. (Thane)

ठाणे जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले ७ विद्यार्थी हे मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातर्फे युक्रेन येथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या हेल्पलाइनवर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधला आहे. यामधील दोन विद्यार्थी सक्खी भावंडे असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेक यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Thane : ठाणे जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी

१) शुभम म्हाडसे – मुरबाड,  २) संतोष चव्हाण – भिवंडी, ३) प्रथमा सावंत – नवी मुंबई, ४) चैताली सांझगिरी – ठाणे, ५) लक्ष  सांझगिरी – ठाणे, ६) हेमंत नेहरे – कल्याण, ७) संकेत पाटील – डोंबिवली

ठाणे येथील मदत कक्ष

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे
फोन नं. ०२२-२५३०१७४०/ २५३८१८८६
ई मेल – thaneddmo@gmail.com

नवी दिल्ली येथील मदत कक्ष

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797, दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905, फॅक्स 011-23088124, ई मेल situationroom@mea.gov.in

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT