Latest

Pfizer : भारतातील १९ औषधनिर्मिती कंपन्या करणार ‘फायझर’च्या कोविड-१९ औषधांची निर्मिती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूवरील 'फायझर' कंपनीच्या (Pfizer) अँटीव्हायरल गोळीच्या देश पातळीवरील निर्मितीसाठी संयुक्त राष्ट्र संचलित मेडिसिन्स पेटंट पूल (MPP) यांच्या 'सब लायसेन्स' करारावर भारतातील १९ औषध निर्मिती कंपन्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. या कोरोनावरील औषधनिर्मितीमध्ये Ritonavir याच्यासहीत Nirmatrelvir हा घटक असणार आहेत.

संयुक्त राष्ट्र संचलित मेडिसिन्स पेटंट पूल (MPP) यांच्या 'सब लायसेन्स' करारावर सुमारे भारतासहीत १२ देशांतील ३५ कंपन्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. कोविड-१९ वरील हे औषध कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या ९५ देशांना पुरविले जाणार आहे. सबलायसेन्स करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या देशांना कोरोनाच्या औषधामध्ये असणाऱ्या Ritonavir, Nirmatrelvir या घटकांसहीत करारानुसार ठरविण्यात आलेल्या इतर घटकांची निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये मेडिसिन्स पेटंट पूल आणि फायझर कंपनीने हा एच्छिक करार केलेला आहे. त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांना त्याचे पालन करावे लागते. सध्या फायझर कंपनी 'पॅक्सलोविड' या नावाने बाजारात औषध विकते. या औषधाला USFDA आणि युके मेडिसिन्स आणि MHRA  यांच्याकडून आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आलेली आहे. (Pfizer)

या करारानुसार ३५ औषध निर्मित कंपन्यांपैकी ६ कंपन्या औषधामध्ये असणाऱ्या विविध घटकांची निर्मिती करणार आहेत. तर ९ कंपन्या प्रत्यक्ष औषधनिर्मिती करतील आणि उरलेल्या २० कंपन्या वरील दोन्हीही कामे करणार आहेत. परंतु, या कोरोनावरील औषधाला WHO च्या पब्लिक हेल्थ इमरजन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्नची मान्यता जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत Nirmatrelvir या औषध घटकाच्या विक्रीतून फायझर कंपनीला उप परवानाधारकांकडून राॅयल्टी मिळणार नाही.

पहा व्हिडिओ : "मी शाहरुख खानसोबत मुव्ही साईन करेन" – अमृता खानविलकर रॅपिड फायर

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT