Latest

कोल्‍हापूर : पेरूचे आमिष दाखवून नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी

निलेश पोतदार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा 

पाच रुपयाच्या पेरूचे आमिष दाखवून नऊ वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहुपुरीतील नराधमाला आज (सोमवार) दहा वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय 23 रा. शाहूपुरी कोल्हापूर) असे नराधमाचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग1) श्रीमती एस. आर. पाटील यांनी खटल्याचा निकाल दिला नराधमाला ठोटावलेल्या दंडापैकी ४० हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

15 सप्टेंबर 2018 मध्ये भरदिवसा घडलेल्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. शाहूपुरी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकून मुसक्या आवळल्या होत्या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलीची आजी आणि अन्य नातेवाईक सकाळी कामाला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती शिवाय गणेशोत्सवासाठी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मुलगी घरात खेळत बसली होती.

या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आरोपी ओकार दाभाडे वेद मुलीच्या घरी आला त्याने तुला पेरू विकत घेण्यासाठी पाच रुपये देतो असे सांगून घराचा आतून दरवाजा बंद केला चटई अंथरून चिमुरडीला विवस्त्र करून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर काही वेळात पीडित मुलीची आजी घराकडे आली असता माथेफिरू तरुण विवस्त्र आढळून आला. शिवाय मुलगी ही त्याच अवस्थेत होती हा प्रकार पाहून आजीला धक्का बसला. तिने आरडाओरडा केला. मात्र, आजीला ढकलून देऊन त्याने घरातून पलायन केले.

याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धर्माविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती जिल्हा व सत्र न्यायाधीश ( वर्ग1) श्रीमती एस आर पाटील यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील अडवोकेट मंजूषा पाटील यांनी खटल्यात अकरा साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या पीडित मुलगी फिर्यादी आजी पंच साक्षीदार डॉक्टर संदेश आडमुठे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

सीए रिपोर्ट आणि आरोपीचा वैद्यकीय दाखला खटल्यात अतिशय महत्त्वाचा ठरला. सदरचा पुरावा आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेत ४० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT