Latest

वर्ल्ड पोलिस फायर गेम्समध्ये मंदार दिवसेला १० पदके; ९ सुवर्ण, एका रौप्य पदकाचा समावेश

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : विनिपेग (कॅनडा) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा खेळाडू मंदार दिवसे याने चार दिवसांत तब्बल १० पदकांची कमाई केली. दोन सुवर्ण हॅट्ट्रीकसह त्याने एकूण ९ सुवर्ण आणि एक कांस्य पदक भारतीय पोलिस दलाला मिळवून दिले.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गुरुवारी झालेल्या दोन मैल (३.२ कि.मी.) आंतराच्या ओपन वॉटर स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तत्पूर्वी मंदारने बुधवारी ८०० मीटर फ्रि स्टाईल, २०० मीटर फ्रिस्टाईल आणि ४ बाय ५० मीटर मिडले रिले प्रकारात तीन सुवर्ण तर ४ बाय ५० मीटर मिक्स मिडले रिले मध्ये रौप्य पदक पटकाविले. मंगळवारी त्याने ४०० मीटर फ्री स्टाईल व ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले मेन या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदके आणि सोमवारी १५०० मीटर फ्रिस्टाईल, २०० मीटर आय एम आणि ४ बाय ५० मीटर मिक्स रिले या प्रकारांनमध्ये तीन सुवर्ण पदके पटकाविली आहेत.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT