पुढारी ऑनलाईन डेस्क : लडाखमधील कुन पर्वतावर सोमवारी झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्करातील सुमारे ४० जवानांची तुकडी अडकली होती. यातील एका जवानाचा मृत्यू झाला, तर तीन जवान बेपत्ता आहेत. मृत जवानाचा मृतदेह सापडला असून सध्या बर्फाखाली अडकलेल्या इतर तीन जवानांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे.
संबंधित बातम्या :
४० जवान हे हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) आणि भारतीय लष्कराच्या आर्मी अॅडव्हेंचर विंगचे होते. कुन पर्वताजवळ नियमित प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडली, असे लष्कराने सांगितले. प्रशिक्षणादरम्यानच हे चार जवान बर्फाखाली अडकले. खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टी असूनही बर्फाच्या मोठ्या साठ्याखाली अडकलेल्या जवानांचा शोध सुरू असल्याचे लष्कराने सांगितले.
हेही वाचा :