समीर वानखेडे देशासाठी किती जीव तोडून काम करतो हे फक्त मलाच माहित आहे, अशी पाेस्ट समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पती समीर वानखेडे यांचे औक्षण करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की , 'माझा प्रिय… माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत, तुझ्याकडून मला खूप काही शिकण्यासारखे आहे.
तुझ्याकडे असणारी शांतता मला खूप काही शिकवते. दृढनिश्चय आणि ध्येयांप्रती असणारा तुझा प्रामाणिकपणा मला नेहमीच चकीत करतो. आपल्या देशाप्रती तुझा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे, तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय.
तुझ्या आपल्या लोकांसाठी किती सुंदर योजना आहेत हे फक्त मला माहीत आहे. हे घडवून आणण्यासाठी सर्वशक्तिमान तुम्हाला आवश्यक असलेली ती सर्व शक्ती प्रदान करो. तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक दिवस उजळत जावो आणि आम्हाला तुमचा दररोज अभिमान वाटत राहो, असेही त्यांनी पाेस्टमध्ये नमूद केले आहे.