अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल राधेश्याम या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकली असून, वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पीडित तरुणी पश्चिम बंगाल राज्यातील असून तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सुभाष गायकवाड (वय २४ वर्षे, रा. भिंगारदिवेमळा, झोपडी कँटीन, अहमदनगर), शहानवाज वहाब हुसेन (वय २१ वर्षे, रा.तपोवन, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल राधेश्याम येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तत्काळ कारवाई करण्यासाठी रवाना झाले. हॉटेल राधेश्याम येथे बनावट ग्राहक पाठवून त्यानंतर छापा टाकला असता हॉटेलच्या तळघरातील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.
त्या ठिकाणी हजर असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हॉटेल मालक सुरज (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या सांगण्यावरून कुंटणखाना चालवीत असल्याची कबुली त्यांनी दिली. या कारवाईत ३३ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक मनोज कचरे, गजेंद्र इंगळे, तनवीर शेख, राजेंद्र औटी, गणेश धोत्रे , गोरख काळे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, सतिष भांड, संतोष जरे, महिला पोलिस पल्लवी रोहकले, पुनम नरसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा