Latest

Kim Sharma : लिएंडर पेस-किम शर्मा लवकरचं विवाहबंधनात अडकणार!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नुकतेच जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. आता लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा ( Kim Sharma ) टेनिसपटू लिएंडर पेस हे  विवाहबद्ध अडकणार आहेत.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, किम शर्मा ( Kim Sharma ) ही  लिएंडर पेससोबत लवकरच कोर्ट मॅरेज करणार आहे. दाेघांच्‍या नातेवाईकांसह आई-वडीलांनी किमच्या मुंबईत वांद्रे येथील घरी  लग्नाची बोलणी केली. यावेळी दाेघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

किम आणि लिएंडर पेसने गेल्या वर्षी दोघांमधील अफेअरची घोषणा करताना सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. मागील वर्षी किम आणि लिएंडरच्या नातेवाईकांनी एकत्रित मिळून नववर्षाचे स्वागत केले होते. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते.  किम आणि लिएंडर दोघेजण अनेकवेळा डिनर डेट आणि सुट्यांचा आनंद घेताना एकत्रित स्पॉटदेखील झाले आहेत. हे कपल जवळपास एक वर्षाच्या डेटिंगनंतर लग्न बंधनात अडकणार असल्‍याची चर्चा सुरु झाली आहे.

किमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, तिने यशराज बॅनरच्या मोहब्बतें (२०००) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले आहे. 'तुमसे अच्छा कौन है', 'जिंदगी रॉक्स', 'मनी है तो हनी है' यासारख्या अनेक चित्रपटात तिने अभिनयाचा ठसा उमठविला आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून किम बॉलिवूडपासून दूरच राहिली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT