पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्याजवळ आज शनिवारी सकाळी (७ मे) यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वॅगनर कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरूष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी व्यक्तींना हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Yamuna Expressway Accident)
या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मथुरेतील अपघातात काही व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. ही ह्रदय पिळवटून टाकणारी दुर्घटना आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बरे होवो ही इश्वराकडे प्रार्थना करतो.
नौझिल पोलीस स्टेशन परिसरात ( यमुना एक्सप्रेस हायवे, मथुरा, उत्तरप्रदेश) माईलस्टोन ६८ येथे हे अपघात झाला. एसपी श्रीशचंद्र यांनी दिलेल्या माहीतीनूसार कार मधील लोक एका लग्न समारंभासाठी जात होते. यादरम्यान ही घटना घडली. या अपघातात एक पुरूष आणि लहान मुलगा असे दोघे जण गंभीर जखमी झाले. यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार चालकाने पहाटे Dial- ११२ ला या अपघाताची माहीती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. या धडकेत कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व जखमी लोकांना पोलीसांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. अपघातातील UP 16 DB9872 ही कार वॅगनआर मॅाडेल असल्याचे पोलीसांनी सांगितले.
उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटमधून या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. मथुरा जिल्ह्य़ाजवळ यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.
हेही वाचा