katrina - ranbir 
Latest

Katrina-Ranbir : कॅटनं रणबीरकडे केलं दुर्लक्ष, पाहा फोटोज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे ( Katrina-Ranbir ) कपल अनेक ठिकाणी एकमेकांसोबत स्पॉट झाले होते.  नाईट पार्टीत दोघांना डिनर डेटवर पाहिलं गेलं होतं. यानंतर दोघेजण लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचा  कयासही चाहत्यांनी लावला होता. मात्र, यानंतर कॅटरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाली. पुढे कॅटरिनाने बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलशी लग्न केलं. सध्या खूप दिवसांनंतर हे कपल पुन्हा एकदा एकत्रित स्पॉट झाले. मात्र, यावेळी कॅटरिनानं रणबीरला दुर्लक्ष केलं आहे. याच घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर सध्‍या जोरदार व्हायरल होत आहेत.

एकेकाळी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ दोघेजण लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असल्‍याची चर्चा हाेती. यानंतर दोघांच्या अफेअरचे वृत्ताची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. परंतु, दोघांच्या ब्रेकअपने चाहत्यांना धक्का दिला. यानंतर कॅटरिनाने विक्की कौशलशी लग्न केलं. लग्नानंतर सध्या खूपच दिवसांनी पुन्हा हे रणबीर आणि कॅटरिना ( Katrina-Ranbir )  एका कार्यक्रमात स्पॉट झाले आहे. नुकतेच केरळमधील कल्याणरामन परिवाराने आयोजित केलेल्या एका नवरात्रीच्या कार्यक्रमाला बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली आहे. याच दरम्यान कॅटरिना आणि रणबीरला पाहिलं गेलं आहे.

या कार्यक्रमात कॅटरिना आणि रणबीरसोबत नागार्जुन, आर माधवन, पृथ्वीराज सुकुमारन, प्रभु गणेश याच्यासोबत अनेकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी कॅटरिना ट्रेडिशनल आउटफिटमध्ये तर रणबीर ब्लॅक रंगाच्या कुर्ता-पजामामध्ये एकदम हॅडसम दिसत आहे. परंतु, या कार्यक्रमात खास करून कॅटरिनाने रणबीरकडे दुर्लक्ष केलं आहे. दोघेजण एका ठिकाणी नसून लांब उभे असल्याचे दिसतेय.  रणबीर एकटक सर्वाकडे पाहताना दिसतोय. तर कॅटरिना रणबीरपासून तिची नजर लपवताना दिसतेय. यासोबत कॅटरिनाने एका फोटोत दुर्गा मातेची आरती घेतानाही देखील दिसली आहे.

दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'रणबीरकडे पाहा, तो कॅटकडे एकटक पाहत आहे', दुसऱ्या एकाने 'रणबीरने कधीही त्याची पत्नी आलियाकडे असे पाहिलेलं नाही, आता आलिया रडणार आहे.' असे म्हटले आहे. यासोबत या फोटोवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : 

(photo ; viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT