कॅटरीना कैफ 
Latest

Katrina Kaif : ढिले कपडे घालून पोट लपवताना दिसली कॅटरीना (video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही अनेक दिवसांपासून कॅटरीना कैफ (Katrina Kaif) प्रेग्नेंसीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. कॅटरीना सातत्याने ढिले-ढिले कपडे घालताना दिसत आहे. कॅटरीना कैफ (Katrina Kaif) नेहमीच ढिल्या कपड्यांमध्ये स्पॉट होत असल्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याचा कयास लावला जात आहे. नुकताच ती मुंबई एअरपोर्टवर पिवळ्या रंगाच्या ढील्या सूटमध्ये दिसली होती. यानंतर तिने काल अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टीला एकटीने हजेरी लावली. या दरम्यान कॅटरीनाने पांढऱ्या रंगाचा सीक्वेंस वर्क थ्री पीस लॉन्ग कुर्ता परिधान केला होता. कॅटरीनाचा हा लूक पाहून पुन्हा प्रेग्नेंसीच्या चर्चांना जोर मिळाला. यावेळी ती आपले पोट लपवताना दिसली. तिने मीडियाला या लूकमध्ये पोझ देखील दिली.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टीत कॅटरीना कैफ एकटी पोहोचली. तिच्यासोबत विक्की कौशलदेखील दिसला नाही. कॅटरीनाने जशी एन्ट्री घेतली तेव्हा तिच्या लूककडे सर्वांच्या नजरा वळल्या. कॅटरीना व्हाईट कलरच्या स्टायलिश कुर्तामध्ये खूप सुंदर दिसत होती. पण, तिचा व्हिडिओ व्हायरल होताच, प्रेग्नेंसीच्या वृत्ताला हवा मिळाली.

पोट लपवताना दिसली कॅट

कॅटरीना कैफ नेहमी टाईट कपड्यांमध्ये दिसते. परंतु, मागील काही दिवसात कॅटरीना कैफच्या ड्रेसिंग सेंसमध्ये बदल झालेला दिसला. ती पोटावर ढिले कपडे घातेलेली दिसते.

लूकवर खिळल्या नजरा

कॅटरीना कैफ पॅपराजींच्या कॅमेऱ्यासमोर आली, तेव्हा तिने किलर पोझ दिले. तर लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण करण्यासाठी लाइट इअररिंग्स, ओपन हेअरस्टाईल, मेकअप केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT