katrina kaif 
Latest

katrina kaif : सुनबाई कॅटरिनाच्या स्वीमसूटवर सासरेबुवांची हटके कमेंट !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅटरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशल हे नुकतेच व्हेकेशन सुट्टीवर गेले होते. अभिनेत्रीने तिथले अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने (katrina kaif) काळ्या स्विमवेअरमधील स्वतःचा एक फोटो देखील शेअर केलाय. या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. इतकंच नाही तर त्याचे सासरे म्हणजेच विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

कॅटरिना आणि विकी कौशल हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. दोघेही बर्‍याच चित्रपटांचे शूटिंग करत आहेत. परंतु, त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते नुकतेच सुट्टीसाठी एका सुंदर ठिकाणी गेले आहेत. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या ट्रिपचे सुंदर फोटो शेअर केले होते. त्या फोटोपैकी कॅटचा काळ्या रंगातील मोनोकिनीमधील एक जबरदस्त फोटो पोस्ट केला आहेत. कॅटच्या या फोटोवर फॅन्स फिदा झाले आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे तिचे सासरे श्याम कौशल यांनाही हा फोटो आवडला आहे. त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी सून कॅटचा स्विमवेअर फोटो सोशल मीडियावर लाईक केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याला २४ लाख ४७ हजार ३५७ लोकांनी लाईक केले आहेत.

कॅट आणि विकी सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. दोघांनी एकत्र क्वालिटी टाईम घालवला आणि सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले.

विकी आणि कॅटचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले होते. राजस्थानमध्ये त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात केवळ १२० पाहुणे उपस्थित होते. हे कपल हनिमूनसाठी मालदीवला गेले होते. आता दोघेही मुंबईत समुद्रासमोर असलेल्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. अनेकदा ते एकमेकांप्रती सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करतात.

या चित्रपटात दिसणार कॅट

बोलायचे झाले तर कतरिना कैफ अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. यात इमरान हाश्मीचीही भूमिका आहे. याशिवाय ती 'फोन भूत'मध्ये दिसणार आहे. यात ईशान खतकर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे.

विकी दिसणार या चित्रपटात

त्याचबरोबर विकी कौशलबद्दल बोलायचे तर त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. 'गोविंदा मेरा नाम'मध्ये तो कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे करण जोहरचा 'तख्त'ही आहे. तो 'सॅम बहादूर' आणि 'द इमॉर्टल अश्वत्थामा'मध्ये दिसणार आहे. त्याने इंदूरमध्ये सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचे शूटिंगही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT