पुढारी ऑनलाईन डेस्क : हेरा फेरी चित्रपटाच्या फ्रेंचायजी (Hera Pheri 3) च्या पुढील भागाची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हेरा फेरी चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबूराव यांच्या त्रिकूट मैत्रीने सर्वांनाच खिळवून ठेवले. आता चाहत्यांची मागणी बघता निर्माते हेरा फेरी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरु करणार आहेत. (Hera Pheri 3) दरम्यान, या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार आहे, हे चाहत्यांना समजताच त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. असं म्हटलं जात आहे की, अक्षय कुमार (Akshay Kumar) नाही तर कार्तिक हा राजूची भूमिका साकारणार आहे.
हेरा फेरी फ्रेंचायजीच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये दिग्गज अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) देखील असणार आहेत. त्यांनी या चित्रपटात कार्तिक आर्यन असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. जेव्हा एका फॅनने परेश रावल यांना विचारलं की, खरंच कार्तिक हेरा फेरीमध्ये आहे का? यावर परेश रावल म्हणाले, 'हो, हे खरं आहे.'
परेशच्या या उत्तराने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. अनेक लोकांनी कमेंट सेक्शन मीम्सने भरला आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, अक्षय कुमार विना हेरा फेरीचं कुठलंच महत्त्व राहत नाही.
परेश रावल यांच्या ट्विटनुसार कार्तिक हा अक्षय कुमारची जागा घेत असल्याचे स्पष्ट होत नाही. सध्या चाहते या वृताने खूप निराश आहेत. आता फक्त निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होण्याची ते वाट पाहताहेत. चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवालाने आगामी हेरा फेरी चित्रपटामध्ये राजूची प्रसिद्ध भूमिका साकारण्यासाठी कार्तिक आर्यनला फायनल केलं आहे.
काही वर्षांपूर्वी, हेरा फेरीच्या निर्मात्यांनी अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारला स्क्रिप्ट आवडली नव्हती. 'हेरा फेरी, वेलकम और आवारा पागल दीवाना अक्षय कुमारच्या सर्वात प्रसिद्ध फ्रेंचाईजी आहेत.