kareena kapoor  
Latest

Kareena Kapoor : करिनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीचं सत्य आलं समोर

स्वालिया न. शिकलगार

[visual_portfolio id="266605"] पुढारी ऑनलाईन डेस्क : करिना कपूर खान (Kareena Kapoor) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. करिना कपूर तिसऱ्यांदा आई होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. वास्तविक, यापूर्वी करिनाने (Kareena Kapoor) तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, जे पाहून लोक अंदाज लावू लागले होते की, कदाचित बेबो प्रेगेन्ंट आहे. या फोटोंमध्ये करीनाचे पोट पाहून लोक तिला बेबी बंप समजू लागले. अशा परिस्थितीत जेव्हा लोक करिनाला तिच्या तिसऱ्या प्रेगेन्सीबद्दल प्रश्न विचारू लागले तेव्हा तिने स्पष्ट करून या वृत्ताला पूर्णविराम दिला. तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रेगेन्सीच्या गोष्टी संपुष्टात आणल्या.

करिना कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितले की, ती प्रेग्नेंट नाही आणि हे सर्व पास्ता आणि वाईनमुळे झाले आहे. करिना कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, "हे पास्ता आणि वाईन आहे. शांत व्हा. मी प्रेग्नेंट नाही. उफ…

सैफ म्हणाला की, त्याने आधीच देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी अधिक योगदान दिले आहे. KKK चा आनंद घ्या."

करिना कपूरने तिच्या पोस्टवरून स्पष्ट केले की ती प्रेग्नेंट नाही. पण लोक तिची मजेदार शैलीदेखील लोक पसंत करत आहेत. हे कॅप्शन लिहिताना करिनाने दोन स्माईल इमोजीही शेअर केले आहेत.

अभिनेत्री करीनाचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ती सैफ अली खानसोबत वाईन आणि पास्ताचा आस्वाद घेताना दिसली होती. लंडनच्या सुट्टीतील या फोटोंमध्ये करीना कपूर खान प्रेग्नेंट दिसत होती. लोकांना चित्रांमध्ये बेबी बंप सारखे काहीतरी दिसत होते, त्यानंतर करिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल अटकळ बांधली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT