बेळगाव : जालीकोप्पजवळ अपघातात मुलगा ठार | पुढारी

बेळगाव : जालीकोप्पजवळ अपघातात मुलगा ठार

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  जालीकोप्पजवळ (ता. बैलहोंगल) अपघातात 11 वर्षांचा मुलगा ठार झाला. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात घडला.

संदीप सिद्धाप्पा मल्लूर (वय 11, राहणार चिवटगुंडी ता. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे.

इराप्पा चन्नबसाप्पा बगणाळ (वय 32) व शिवबसप्पा बसवंतप्पा मल्लूर यांच्यासह संदीप असे तिघे दुचाकीवरून निघाले होते. इराप्पा दुचाकी चालवत होते तर संदीप त्यांच्या पुढे बसला होता.

Back to top button