द ग्रे मॅन : एका दृश्यासाठी खर्च केले 319 कोटी रुपये | पुढारी

द ग्रे मॅन : एका दृश्यासाठी खर्च केले 319 कोटी रुपये

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्व्हल स्टुडिओजच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चे दिग्दर्शक अँथनी आणि ज्यो रूसो या भावंडांचा बहुचर्चित चित्रपट ‘द ग्रे मॅन’या शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रीलिज होत आहे. हा अ‍ॅक्शन चित्रपट नेटफ्लिक्सचा सर्वाधिक महागडा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 200 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1600 कोटी रुपये इतके आहे. तर यातील एका सीनवर जवळपास 319 कोटी रुपये खर्च झाला आहे. चित्रपटाचे शूटिंगही काही खास जागांवर झालेले आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन डिझाईन करायला एक महिन्याचा कालावधी लागला होता. चित्रपटात अनेक हायटेक अ‍ॅक्शन द़ृश्ये असणार आहेत.

अभिनेता रायन गॉसलिंगवर चित्रीत झालेल्या एका द़ृश्यावर 40 मिलियन डॉलर म्हणजे 319 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात रायन हल्लेखोरांच्या एका तुकडीसोबत लढताना दाखवला आहे. चित्रपटात अभिनेता ख्रिस इव्हान्स याची निगेटिव्ह भूमिका असल्याचे समजते. अभिनेत्री अ‍ॅना डी अरमास देखील यात आहे. याशिवाय या चित्रपटाचे एक विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता धनुष या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Back to top button