Karad Crime: दोन चिमुरड्यांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न 
Latest

Karad Crime: कराडमध्ये दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

रणजित गायकवाड

कराड; पुढारी वृत्तसेवा : Karad Crime स्वतःच्या सहा व आठ वर्षाच्या दोन मुलांचा गळा दाबून आईनेच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. कराडच्या रुक्मिणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

हर्ष (वय ८) आणि आदर्श (वय ६) अशी आईनेच स्वतःच्या मुलांचा खून केलेल्या मुलांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे.

अधिक वाचा :

याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे.

त्यांच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कराड शहर व परिसर हादरले असून एकच खळबळ उडाली आहे. अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

घटनास्थळी डीवायएसपी डॉक्टर रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक राहुल वरुटे यांनी भेट दिली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT