कंगना-प्रियांका  
Latest

Kangana Ranaut : प्रियांका चोप्राने त्रासून सोडलं ‘बॉलिवूड’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तर ट्विटरवर ती स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. आता पुन्हा कंगना चर्चेत आलीय. प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडून हॉलिवूडचा मार्ग का धरला, यावर कंगनाने नवा खुलासा केला आहे. इतकचं नाही तर पुन्हा एकदा करण जोहरवरदेखील आरोप केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय. फॅन्स तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत. (Kangana Ranaut)

माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत हॉलीवूडचा रस्ता का धरावा लागला, याबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, 'कानाकोपऱ्यात ढकललं' जात होतं आणि चित्रपट इंडस्ट्रीतील राजकारणाला कंटाळले होते. यावर कंगनाने अभिनेत्रीला समर्थन देत ट्विटरवर लिहिलं, "बॉलिवूडविषयी प्रियांका चोप्राचे हे म्हणणं आहे की, लोकांनी तिच्याविरोधात एक गट बनवला आहे. तिला धमकावलं आणि इंडस्ट्रीतून बाहेर केलं. चित्रपट इंडस्ट्रीने आपल्या हिमतीवर ओळख बनवणाऱ्या महिलेला भारत सोडण्यासाठी भाग पाडले. प्रत्येकजण जाणतो की, करण जोहरने तिला बॅन केलं होतं.

या ट्विटवर रीट्विट करत लिहिलं, "मीडियाने करण जोहरसोबत असलेली तिची खंत लिहिली. कारण शाहरुख खानसोबत तिची मैत्री होती. मुव्ही माफियाला आउटसायडर्सच्या रुपात एक नवा पंचिंग बॅग मिळाला होता. तिला इतका त्रास दिला की, तिला भारत सोडावा लागला. 'या' अप्रिय, ईर्ष्याळू, स्वार्थी आणि विषारी व्यक्तीला चित्रपट इंडस्ट्रीची संस्कृती आणि वातावरण खराब करण्यासाठी दोषी अन्‌ जबाबदार ठरवायला हवं…"

कंगना रानौत आणि प्रियांका चोप्राने २००८ मध्ये चित्रपट फॅशनमध्ये एकत्र काम केलं होतं, त्यानंतर २०१३ मध्ये 'शूटआऊट ॲट वडाला' आणि 'क्रिश ३' मध्ये देखील को-स्टार होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT