कंगना रनौत 
Latest

kangana ranaut : जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्‍यानंतरची कंगनाची पोस्ट चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) या ना त्या कारणाने चर्चेत असते. स्पष्ट बोलणारी कंगना अनेकदा वादग्रस्त वक्तवेय करून अडकली आहे. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयीचा खुलासा तिने सोशल मीडियाच्या माध्यामातून केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे तिने (kangana ranaut) पोस्टमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी कंगनाने पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोत ती तिच्या आई आणि बहिणीसोबत सुवर्णमंदिरात जात असताना दिसत आहे. तर पुढील फोटो हे संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे फोटो आहेत. हे सर्व फोटो शेअर करत तिने मोठी पोस्ट लिहिलीय.

तिने म्‍हटलं आहे, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करुन मी लिहिले की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या घटनेत देशातील काही अंतर्गत देशद्रोहींचा हात असू शकतो. देशातील अनेक देशद्रोही अशाप्रकारे विरोधकांना मदत करतात. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात. माझ्या या पोस्टवर मला अनेकांकडून सतत धमक्या येत आहेत.

भटिंडा येथील एकाने तर मला उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिलीय. पण, मी अशाप्रकारच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. देशाच्या विरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात मी बोलते. पुढेही बोलत राहीन. अनेक निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असो, तुकडे तुकडे गँग असो किंवा खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात असलेले दहशतवादी असो."

लोकशाही ही आपल्या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो; पण अखंडता, एकात्मता आणि नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा ठराविक गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही म्हटलेले नाही, असेही तिने म्‍हटलं आहे.

मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजी यांना आठवण करून देऊ इच्छिते. तुम्ही देखील एक महिला आहात. तुमची सासू इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यामुळे कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी व्यक्तींकडून येणाऱ्या धमक्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंतीही तिने केली आहे.

मी धमकी देणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे मला आशा आहे की पंजाब सरकार यावर लवकरच कारवाई करेल. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यासाठी मला बलिदान द्यावे लागले तरी मला मान्य आहे. मी घाबरत नाही आणि कधीही घाबरणार नाही. देशाच्या हितासाठी देशद्रोह्यांच्या विरोधात उघडपणे बोलत राहीन, असेही तिने पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT