juhi chwla and shahrukh khan  
Latest

Juhi Chawla : जेव्हा जुहीने शाहरुखला लावली थोबाडीत…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जुही चावलाचा पहिला हिट चित्रपट 'कयामत से कयामत तक'ने रिलीज होऊन ३४ वर्षे पूर्ण झाली. जुही चावलाच्या 'हुश हुश' या आगामी वेबसीरीजबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. मालिकेची रिलीज डेट जाहीर व्हायला अजून वेळ आहे. पण, यानिमित्तने तिचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे.

जुही चावला आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. दोघांनी मिळून चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केलीय दोघांची मैत्री केवळ फिल्मी नाही तर दोघेही एकमेकांच्या सुख-दु:खात एकत्र असतात. जेव्हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात तुरुंगात होता, तेव्हाही जुही चावलाही त्याची जामीनदार होती.

शाहरुख खान आणि जुही चावला यांनी रेड चिलीजपूर्वी ड्रीम्स अनलिमिटेड कंपनी सुरू केली होती. शाहरुख खान आणि जुही चावला यांनी या चित्रपटाच्या पहिल्या चित्रपट 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काय घडले की, जेव्हा जुही चावलाने शाहरुख खानला चपराक लावली होती.

त्यावेळी खूपच घाबरली होती जुही…

शाहरुख खान आणि जुही चावला त्या दिवसांत हैदराबादच्या रामोजी फिल्म स्टुडिओमध्ये 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' चित्रपटाचे शूटिंग करत होते. चित्रपटाचा अॅक्शन मास्टर एक अॅक्शन सीन चित्रित करत होता. तो अॅक्शन सीन एका गाण्याच्या मधोमध होता. याबद्दल शाहरुख खान खूप उत्सुक होता. वास्तविक, शूटिंगदरम्यान एक सीन होता ज्यामध्ये आगीचा गोळा बाहेर पडतो. शूटिंगच्या अगदी आधीपर्यंत जुहीला याची माहिती नव्हती. हा आगीचा चेंडू बाहेर आल्यावर जुही चावला खूपच घाबरली आणि रागाच्या भरात तिने शाहरुख खानला एक थप्पड मारली. शूटिंगमधून बाहेर पडल्यानंतर ती मेकअप रूममध्ये गेली. शाहरुख खान पुन्हा जाऊन जुहीची मनधरणी करून तिला सेटवर आणले. त्यानंतर शूटिंगला सुरुवात झाली.

जुहीकडून चूक झाली, शाहरुखने माफी मागितली

शाहरुखची चुकी नसताना तो माफी मागायला का गेला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शाहरुख चित्रपटाच्या फायरबॉल सीक्वेन्सबद्दल खूप उत्सुक होता तर जुही चावला तो सीन करायला घाबरत होती. असे काहीही होणार नाही असे सांगून शाहरुख खानने जुही चावलाला त्या सीनसाठी राजी केले. शाहरुख खानचे ऐकल्यानंतरच जुही शूटिंगसाठी आली होती. पण, आगीचा गोळा तिच्या जवळून गेला, तेव्हा ती खूप घाबरली होती. तिने शाहरुखला थप्पड मारल्यानंतर रागाच्या भरात व्हॅनिटी व्हॅनकडे गेली. आपल्या चुकीमुळे जुहीला राग आल्याचे शाहरुख खानला वाटले, म्हणून त्याने स्वतः जाऊन तिची मनधरणी केली आणि तिला परत आणले.

'राम जाने'च्या शूटिंगवरही मारली थप्पड

शाहरुखच्या 'राम जाने' या चित्रपटात तिच्यासोबत जुही चावलाही होती. 'अंजाम', 'बाजीगर' आणि 'डर' व्यतिरिक्त या चित्रपटात शाहरुख खानही नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. राम जाने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही एका सीनच्या चर्चेदरम्यान जुही चावलाने रागाच्या भरात शाहरुख खानला थप्पड मारल्याचे म्हटले जाते.

शाहरुख खान आणि जुही चावला यांची पहिली भेट 'राजू बन गया जेंटलमन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. माहितीनुसार, जेव्हा जुहीने शाहरुख खानला पाहिले तेव्हा तिची प्रतिक्रिया अशी होती की, तो कोणत्या अँगलमधून हिरोसारखा दिसतो? त्या काळात शाहरुख खानचे चित्रपट नुकतेच सुरू झाले होते आणि तोपर्यंत जुही चावला स्टार बनली होती. पण, शाहरुखसोबत काम करताना आपली फसवणूक झाल्याचे जुहीला वाटले. यासाठी तिने चित्रपटाच्या सहनिर्मात्यालाही खडसावले होते म्हणे. पण, हा चित्रपट सुपरहिट ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT