virani wedding : शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी | पुढारी

virani wedding : शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. दरम्यान, मृणाल कुलकर्णींच्या (virani wedding) होणाऱ्या सुनेच्या घरी मेहंदीचा सोहळा पार पडला. अभिनेत्री शिवानी रांगोळे ही ७ मे रोजी विराजससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (virani wedding)

आता विराजस-शिवानीच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. आता हळदी, मेहंदीच्या समारंभांना सुरुवात झालीय. नुकताच त्यांचा मेहंदीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही क्षण पाहा…

या सोहळ्यासाठी शिवानीने हिरव्या रंगाचा काठपदराच्या साडीचा ड्रेस घातला होता. त्यावर फुलांचे दागिने अशा पेहराव्यामध्ये शिवानी खूप सुंदर दिसतेय. विराजसने शिवानीच्या हातावर मेहंदी काढतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात.

शिवानी-विराजसचा जेव्हा साखरपुडा झाला होता. त्यावेळी तिने Put a ring on it!#2022 #virani अशी कॅप्शन लिहित इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. हातातील अंगठी दाखवत तिने फोटो शेअर केला होता. यासोबत तिने #virani असा हॅशटॅग दिला होता.

तिने इन्स्टाग्रामवर रिंगसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोला कॅप्शन दिली होती की, ‘२०२२मध्ये रिंग घातली.’ या दोघांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

‘माझा होशील ना’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेता विराजस कुलकर्णीने वाहव्वा मिळवली होती. तर शिवानी रांगोळेदेखील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने ‘सांग तू आहेस का?’ मालिकेत भूमिका केली होती.

विराजस कुलकर्णीची आई प्रसिध्द अभिनेत्री

अभिनेत्याची आई प्रसिध्द मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. shivani ने छोट्या पडद्यावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम केले होते. ही मालिका संपुष्टात येऊन बराच कालावधी गेला आहे. यातील shivani ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
shivani आणि virjas यांच्या इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली होती. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ ही तिची गाजलेली मालिका आहे.

विराजस-शिवानी यांचा विवाह येत्या ७ मे रोजी पुण्यात होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

Back to top button