पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडमध्ये नव्याने शपथ घेतलेल्या चंपई सोरेन सरकारची महत्त्वाची बहुमत चाचणी सोमवारी (दि. ५) होत आहे. आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून हैदराबादला पाठवलेले सर्व ४० आमदार रविवारी सायंकाळी रांचीला परतले आहेत. (Jharkhand News)
हेमंत सोरेन यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी 'झामुमो'चे चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. या सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले आहे. (Jharkhand News)
जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर 'झारखंड मुक्ती मोर्चा'चे नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी २ फेब्रुवारीला रांची येथील राजभवनात नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (Jharkhand New CM) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे झारखंडमधील चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करत नशीब आजमावणार आहेत.
'झारखंड मुक्ती मोर्चा' विधीमंडळ पक्षाने नेते चंपाई सोरेन हे एक भारतीय राजकारणी आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. यानंतर ते झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले. आज २ फेब्रुवारी २०२४ पासून झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य आहेत आणि सेराईकेल्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान त्यांच्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी असणार आहे.