Latest

JEE Main : जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज (दि. 29) जेईई मेन 2023 सत्र 2 (JEE Main Session 2) चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेले उमेदवार त्यांच्या अॅप्लिकेशन क्रमांकाद्वारे अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर निकाल पाहू शकतात व डाउनलोड करू शकतात. निकाला व्यतिरिक्त उत्तर पत्रिका, टॉपर्स लिस्ट, ऑल इंडिया रँक लिस्ट, कट ऑफ, पर्सेंटाइल आणि इतर माहिती देखील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

निकालासोबतच जेईई मेन'च्या दुसऱ्या सत्रातील टॉपरचे नावही जाहिर करण्यात आले आहे. सिंगाराजू वेंकट कौंडिन्य हा ऑल इंडिया रँक एक मिळवून जेईई मेन 2023 चा टॉपर बनला आहे. त्याने या परिक्षेत 100 एनटीए स्कोर मिळवला. NTA ने अजून जेईई मेन्ससाठी अधिकृत टॉपर मेरिट लिस्ट जाहीर केलेली नाही. लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर या वर्षी किती विद्यार्थ्यांनी 100 NTA स्कोअर मिळवला हे समजेल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT