जयंत पाटील  
Latest

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा, विचारसरणी नथुराम गोडसेची; जयंत पाटील यांची राज ठाकरेंवर टीका

स्वालिया न. शिकलगार

इस्लामपूर (जि. सांगली) : पुढारी वृत्तसेवा

२०१४ला मोदींना पाठिंबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर ही टीका ट्विटरच्या माध्यमातून केली. वारंवार रंग बदलणारे व्हायरस राज्यात वाढत आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले.

ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका केली. त्यांनी सभेमध्ये नेत्यांची मिमिक्री केली. पाटील यांनी मनसे विझलेला पक्ष अशी टीका केली होती. पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांनी राज ठाकरे यांना ट्विटरद्वारे उत्तर दिले.

ते म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. २०१९ निवडणुकीवेळी मोदी यांच्या विरोधात रान उठवले होत. आता पुन्हा त्यांनी मोदींची पालखी खांद्यावर घेतली आहे. राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे; मात्र त्यांची विचारसरणी नथुराम गोडसेची आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरेंचे ते पुतणे आहेत. मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT