Latest

विराट कोहली सीएसकेविरुद्ध चौताळून खेळतोच; ही घ्या आकडेवारी!

backup backup

आयपीएलच्या १४ व्या हंगामात आज विराट कोहली आपल्या मेंटोर विरुद्ध म्हणजे महेंद्रसिंह धोनी विरुद्ध दंड थोपटले आहेत. आजच्या आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र विराट कोहलीने धोनाचा हा निर्णय धडाकेबाज सुरुवात करत निष्प्रभ ठरवला.

विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीला खेळण्यास येत आहे. सीएसके विरुद्ध सलामीला येत त्याने मैदानात वादळच आणले. दरम्यन, त्याने टी २० क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात बदल केला. यापूर्वी टी २० क्रिकेटमध्ये विराटने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सर्वाधिक ९३३ धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात विराटने धडाकेबाज सुरुवात करत आतापर्यंत ४० धावांपर्यंत मजल मारली आहे.

त्यामुळे आता विराट कोहलीच्या टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झाल्या आहेत. त्याने सीएसके विरुद्ध ९३९ धावा केल्या आहे. त्याच्या खालोखाल दिल्ली कॅपिटल्सचा नंबल लागतो. दिल्ली विरुद्ध त्याने ९३३ धावा केल्या आहेत. यातबरोबर चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. त्यांच्या विरुद्ध विराट कोहलीने ७३५ धावा केल्या आहेत. त्या खालोखाल विराटने मुंबई इंडियन्स विरुद्ध ७२८ धावा केल्या. या यादीत ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७१८ धावा केल्या आहेत.

दरम्यान, आजचा सीएसके विरुद्ध आरसीबी सामना सुरु होण्यापूर्वीच वादळ आल्याने सामना सुरु होण्यास उशीर झाला. हे वादळ शमल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताणाऱ्या आरसीबीने धडाक्यात सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फटके मारले. त्याला देवदत्त पडिक्कलने त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी संघाला पॉवर प्लेमध्ये ५५ धावांपर्यंत पोहचवले. यात विराटचा ३३ धावांचा वाटा होता.

हेही वाचले का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT