केकेआर कॅप्टन मॉर्गनला मुंबईवर विजय मिळवूनही होणार मोठी शिक्षा! | पुढारी

केकेआर कॅप्टन मॉर्गनला मुंबईवर विजय मिळवूनही होणार मोठी शिक्षा!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन :  केकेआर कॅप्टन इऑन मॉर्गनने आएपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामन्यांची सुरुवात जोरदार केली. काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायर्डस संघाच्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चांगलेच लोळवले. केकेआर ने मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव करत पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकवर धडक मारली. मात्र या विजयाचा जल्लाोष केकेआर कॅप्टन मॉर्गला फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्याला आता मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

काय आहे शिक्षेचं कारण?

केकेआर कॅप्टन मॉर्गनला मुंबईविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे २४ लाख रुपयांचा दंड भराव लागला आहे. कोलकाताच्या संघाने स्लो ओव्हर रेटचा नियम या स्पर्धेत दुसऱ्यांदा मोडल्याने मॉर्गनला इतका मोठा अर्थिक दंड बसला आहे.

मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्ये केकेआरच्या प्लेईंग 11 मधील अन्य खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फिसमधील २५ टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी आहे तितका दंड भरावा लागणार आहे.

यापूर्वी पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला देखील याच कारणामुळे आर्थिक दंड बसला आहे. सॅमसनची ही पहिलीच चूक असल्यानं त्याला १२ लाखांचा दंड बसला.

मॉर्गनवर निलंबनाची टांगती तलवार?

मॉर्गननं दुसऱ्यांदा हा नियम मोडला आहे. त्यामुळे या स्पर्धेत पुन्हा एकदा त्याने स्लो ओव्हर रेटची चूक केल्यास त्याला एका मॅचसाठी निलंबित केले जाईल. तसंच त्याला 30 लाखांचा दंड भरावा लागेल. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये मॉर्गनवर निलंबनाची टांगती तलवार असेल.

आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला निर्धारित वेळेमध्येच २० ओव्हर पूर्ण कराव्या लागतात, पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन यांनी हा नियम न पाळल्यानं आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचलत का :

‘बेगम’ अनुजाला सासर आवडतं की माहेर

Back to top button