IPL Controversy : आयपीएलच्या सुरूवातीच्या वर्षांतचं झाले होते 'हे' मोठे वाद www.pudharinews  
Latest

IPL Controversy : आयपीएलच्या सुरूवातीच्या वर्षांतचं झाले होते ‘हे’ मोठे वाद

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ललित मोदींनी सतत चार आयपीएलच्या संकल्पनेवर काम केले होते. इंडियन प्रिमियर लीग सुरू करण्याची संकल्पना ललित मोदींनी मांडल्यानंतर अनेक उद्योजकांनी आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. २००८ साली ललित मोदींनी आयपीएलच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आयपीएलला भारतात मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली. पण सुरूवातीच्या काळात इंडियन प्रिमियर लिगमध्ये अनेक वाद झाले. या वादांशिवाय आयपीएलचा सुरूवातीचा इतिहास पूर्ण होणार नाही. (IPL Controversy)

सुरूवातीच्या काळात कोणते वाद झाले? ते पाहूयात….

१. हरभजन सिंग – श्रीसंत वाद

आयपीएलच्या पहिल्या वर्षांत हरभजन सिंग आणि श्रीसंथ याच्यामध्ये मोठा वाद झाला होता. हरभजन सिंगने भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंथला कानशिलात लगावली होती. २००८ साली किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हा वाद झाला होता.

२ . ललित मोदी

ललित मोदींच्या संकल्पनेतूनचं आयपीएल भारतात स्थिरावले होते. कमी कालावधीतच या लीगने मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र, २०१० साली ललित मोदी मोठ्या प्रकरणात अडकले. त्यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बीसीसीआयने आयपीएलच्या चेअरमन पदावरून काढून टाकले होते. २०१३ साली बीसीसीआयने ललित मोदींना क्रिकेटच्या कोणत्याही प्रशासकीय पदावर राहता येणार नाही असा, निर्णय घेतला होता. (IPL Controversy)

३. वानखेडेवर शारूख खानला बंदी

किंग खान म्हणून ओळखला जाणाऱ्या शारूख खानने कोलकाता नाईट राईडर्स हा संघ आयपीएलमध्ये उतरवला होता. २०१२ साला सामना पाहण्यासाठी तो वानखेडे स्टेडियवर आला होता. तिथे शारूख आणि सिक्युरिटी गार्डमधील झालेला वाद फार गाजला होता. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनने शारूख खानला वानखेडे स्टेडियवर येण्यासाठी तीन वर्षे बंदी घातली होती. जी २०१५ साली उठवण्यात आली होती. (IPL Controversy)

४. स्पॉट फिक्सिंग

श्रीसंथ, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्स खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगचे चार्जेस लावले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या खेळाडूंना क्रिकेटमध्ये आजन्म बंदी घालण्यात आली. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणानंतर भारतात आयपीएलवरील सट्ट्याचे प्रमाण फार वाढले होते. (IPL Controversy)

५. राहुल शर्मा आणि वेन पारनेल ड्रग्स प्रकरण

पुणे वॉरियर्स इंडिया या संघाचे खेळाडू राहुल शर्मा आणि वेन पारनेल २०१२ साली रेव्ह पार्टीत ड्रग्स घेताना आढळले होते. मुंबई पोलिसांनी ही धाड टाकली होती. याप्रकरणानंतर या खेळाडूंचा कोणत्याही संघात समावेश करण्यात आला नाही. (IPL Controversy)

६. कायरन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क

२०१४ साली आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यादरम्यान पोलार्ड आणि स्टार्क यांच्यामध्ये वाद झाला होता. पोलार्डने मिचेल स्टार्कवर बॅट उगारली होती. यानंतर दोघांनाही दंड सुनावण्यात आला होता आणि दोन सामन्यांसाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होता. या सामन्यातील कायरन पोलार्डचे ७५ टक्के मानधन तर मिचेल स्टार्कचे ५० टक्के मानधन दंडाच्या स्वरूपात घेण्यात आले होता.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT