नाशिक : मनसे पदाधिकार्‍यांना पोलिसांच्या नोटिसा ; दिला ‘हा’ इशारा | पुढारी

नाशिक : मनसे पदाधिकार्‍यांना पोलिसांच्या नोटिसा ; दिला 'हा' इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात मनसेने 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे, तर रमजान महिना सुरू असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी मनसे पदाधिकार्‍यांना सीआरपीसी 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

नोटिशीचा भंग केला, तर कायदेशीर कारवाई करून, ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

तत्कालीन पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळावरील भोंग्यांना लेखी परवानगी घेण्यास सांगितले आहे, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे 3 मेपर्यंत न उतरवल्यास भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी मनसे पदाधिकारी दिलीप दातीर, अंकुश पवार आदींना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात रमजान महिना साजरा होत असून, मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, कोणत्याही कृत्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होईल व सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल, असे कृत्य आपणाकडून अथवा कार्यकर्त्यांमार्फत घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तुम्ही पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीत देण्यात आला आहेे.

हेही वाचा :

Back to top button