Latest

M S Dhoni : सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूचा धोनीला आशीर्वाद (व्हिडिओ)

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू के. श्रीकांत यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या दमदार खेळासाठी आशीर्वाद दिला. बुधवारी (दि.५) श्रीकांत, ब्राव्हो आणि मुरली विजय सीएसके​​च्या ड्रेसिंग रूममध्ये चेन्नईच्या खेळाडूंना भेटले. सीएसकेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने एक सामना जिंकला आहे तर एकात पराभव झाला आहे. आता सीएसके पुढचा सामना ८ एप्रिलला मुंबई इंडियन्ससोबत खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर संघाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माजी क्रिकेटर्स के श्रीकांत, ब्राव्हो आणि मुरली विजय सीएसके​​च्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटत आहेत. एवढेच नाही तर श्रीकांत यांनी धोनीला भेटल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादही दिला. यानंतर धोनी मुरली विजयलाही भेटतो, याचा व्हिडिओ सीएसकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात सीएसकेचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला होता. यानंतर पुढच्या सामन्यात सीएसकेने लखनौ सुपरजायंट्सचा १२ धावांनी पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. आता पुढचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे सीएसके मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात हरवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. लखनौविरोधात दोन गगनचुंबी षटकार मारून धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारा तो सातवा खेळाडू ठरला आहे. आता पुन्हा एकदा धोनीच्या बॅटची जादू मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये चाहत्यांना पाहायला मिळू शकते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT