Latest

Internet Addiction Disorder : गॅझेटस्चा अतिरेक; इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरचे लहानगेही बळी

मोहन कारंडे

सातारा; मीना शिंदे : गेल्या काही वर्षांपर्यंत तंबाखू, दारू, सिगारेट अशा व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व्यसमुक्ती केंद्र कार्यरत होती; मात्र कोरोना महामारीपासून गॅझेटस्चा वापर वाढल्याने इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर (Internet Addiction Disorder) हा नव्याने समोर आलेला मानसिक आजार आहे. मोठ्यांसह लहानगीही याचे बळी ठरत असल्याने सोशल मीडिया डिअ‍ॅडिक्शन सेंटरची गरज वाढली आहे.

कोरोना काळापासून मोबाईल व इंटरनेटसह विविध गॅझेटस्चा वापर वाढला. ती सहज हाताळता येवू लागली. पुढे या गॅझेटस्चे व्यसनच लागले. वैद्यकीय भाषेत इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर (Internet Addiction Disorder) ही नव्याने समोर येऊ लागलेली समस्या आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमींगचे व्यसन दूर करणे वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान आहे. दारू, गांजा, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत, हे समजावता येते. पण, इटरनेट व मोबाईलचा वापर हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने गॅझेटस्चे डिअ‍ॅडिक्शन अधिक धोकादायक ठरत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने डिअ‍ॅडीक्शन सेंटरची गरज वाढली आहे. मानसोपचारतज्ज्ञांकडे इतर मानसिक आजारांचे रुग्ण असल्याने डिअ‍ॅडिक्शनसाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. मोठ्या शहरांप्रमाणे निमशहरी भागातही डिअ‍ॅडिक्शन सेंटर सुरू होण्याची गरज वाढली आहे.

'डिजीटल वेल बिईंग'चा वापर आवश्यक

प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये वेल बिईंग सॉफ्टवेअर असते. मात्र, याच्या वापराबाबत अद्याप फोनधारकांमध्ये जागृती झालेली नाही. हे सॉफ्टवेअर आपण कितीवेळ सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहोत याचा हिशेब ठेवते. याद्वारे टाईमर लावल्यास सोशल मीडियाच्या अतिवापराला आळा बसण्यास मदत होते.

शारीरिक व मानसिक आजारांप्रमाणेच इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर बाबतही मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने आजाराची लक्षणे दिसताच तज्ज्ञांशी संपर्क साधावा. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेतल्यास कमी वेळात रुग्ण कव्हर होतो.
– डॉ. हमीद दाभोळकर, मनोविकारतज्ज्ञ, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT