MP Sanjay Raut : राजकीय मतभेद असले तरी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार- संजय राऊत | पुढारी

MP Sanjay Raut : राजकीय मतभेद असले तरी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार- संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो यात्रा हा ऐतिहासिक कार्यक्रम राहुल गांधी यांनी सुरु केला. ४५०० किमी पेक्षा अधिक प्रवास या यात्रेने केला आहे. ही फारच महत्वाची गोष्ट आहे. या यात्रेमुळे संपुर्ण देश मनाने आणि भावनेने एकत्र जोडला जाईल. राहुल गांधी म्हणतात की देशातील द्वेष, सूड नष्ट करण्यासाठी ही यात्रा आहे. खरतर आपण सर्वांनीच त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे. जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी या यात्रेत आम्ही सहभागी होत आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले.

संजय राऊत म्हणाले की, विस्थापित काश्मिरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यांना प्रश्न विचारणार आहे. जम्मूमध्ये आमचा पक्ष चांगला काम करत आहेत. त्यासंदर्भात मी तिथे जावून पाहणी करणार आहे. उद्धवजींनी काही सुचना दिल्या आहेत त्यांच मी पालन करणार आहे.

MP Sanjay Raut : पंतप्रधानांना कोणताही विरोध नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात बोलत असताना ते म्हणाले, ते पंतप्रधान आहेत त्यांच स्वागत झालंच पाहिजे. पंतप्रधानांना कोणताही विरोध नाही. राजकारण झालं तर बघू. शिवसेनेने यापूर्वी जे काम केलं आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांना भाजपने निमंत्रित केले आहे. आज ज्याचं लोकार्पण केल जाणार आहे, त्यातील बहुतांश कामे शिवसेनेने केली आहेत.

हेही वाचा 

Back to top button