मृृत्यू प्रमाणपत्रात ‘कोरोना’ न लिहिण्याचा चीनचा आदेश | पुढारी

मृृत्यू प्रमाणपत्रात ‘कोरोना’ न लिहिण्याचा चीनचा आदेश

बीजिंग; वृत्तसंस्था : कोरोनामुळे चीनमध्ये अजूनही भयावह स्थिती आहे. त्यातच वस्तुस्थिती लपविण्यासाठी चीन सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मृत्यू प्रमाणपत्रात कोरोनाचा उल्लेख न करण्याचा आदेश चीन सरकारने देशातील डॉक्टरांना दिला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, रुग्णाला आधीपासून कोणता आजार असेल, तर त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात कोरोनाऐवजी त्या आजाराचा उल्लेख करा; पण रुग्णाचा मृत्यू केवळ कोरोनाने झालेला असेल, तर संबंधित डॉक्टर मृत्यू प्रमाणपत्र देण्यापूर्वी आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेतील. त्यांच्या सल्ल्यानंतरच तसे मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशा पद्धतीने कोरोना मृतांची आकडेवारी लपविण्यार्‍या चीनची जगभरातून निंदा होत आहे.

Back to top button