ताज महालच्या तिप्पट आकाराचा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या दिशेने अत्यंत वेगाने येत आहे. हा एखाद्या स्टेडियम एवढा ॲस्ट्रॉईड २४ जुलै रोजी पृथ्वीजवळून जाणार आहे. या ॲस्ट्रॉईडला २००८ जीओ २० असे नाव देण्यात आले आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या दिशेने १८ हजार मैल प्रतीतास वेगाने येत आहे. याचा सरासरी वेग हा ८ किलोमीटर प्रतिकसेकंद इतका आहे. या वेगाने येणाऱ्या ॲस्ट्रॉईडच्या मार्गात जे काही येईल ते नष्ट होईल.
पृथ्वीला धोका आहे?
नासाच्या पृथ्वीजवळील गोष्टींच्या डाटाबेसनुसार या ॲस्ट्रॉईडचा व्यास २२० मिटर इतका आहे. तो २८७ कोटी ०८ लाख ४७ हजार ६०७ किलोमीटर अंतरावरून येत आहे. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा ८ पटीने जास्त आहे.
नासाने सांगितले आहे की हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या जवळून सुरक्षितरित्या पुढे जाईल. असे असले तरी या २००८ जीओ२० ॲस्ट्रॉईडच्या ऑरबीटला अपोलो श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या श्रेणीत सर्वात धोकादायक ॲस्ट्रॉईडची गणना केली जाते.
पृथ्वीच्या कक्षेजवळ असातत त्यांना अपोलो श्रेणीतील गणले जाते. १८६२ अपोलो ॲस्ट्रॉईडचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ कर्ल रेनमुथ यांनी लावला होता. त्यानंतर ही श्रेणी तयार करण्यात आली.
हा २००८ जीओ२० ॲस्ट्रॉईड नासाच्या वेबसाईटनुसार कक्षेजवळूनच जाणार आहे. तो पृथ्वीला धडकेल अशी शक्यता अत्यंत कमी आहे. तो पृथ्वीच्या जवळून निघून जाईल याबाबत नासा अत्यंत सकारात्मक आहे. नासा या ॲस्ट्रॉईडवर नजर ठेवून आहे.
सौरमालेची निर्मिती होत असताना ॲस्ट्रॉईडची निर्मिती होते. नासाच्या संयुक्त प्रोपुलेशन प्रयोगशाळेनुसार पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या ॲस्ट्रॉईडच्या अंतर हे पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराशी तुलना करता १.३ पटापेक्षा जास्त नाही.
गेल्या काही काळात पृथ्वीच्या कक्षेजवळ ॲस्ट्रॉईड आढळून येण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये २०२० क्यूएल विझार्ड ॲस्ट्रॉईडही पृथ्वीजवळून गेला होता.
दरम्यान, ॲस्ट्रॉईड २००८ जीओ२० हा पृथ्वीच्या जवळून २४ जुलैला दुपारी ३.३५ ला ( पूर्व दिशेच्या वेळेनुसार ) जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी तो पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा