लंडन ; पुढारी ऑनलाईन : देशातील विविध बँकांचे नऊ हजार कोटींहून अधिक कर्ज बुडविणार्या विजय माल्ल्या याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर ठरवले आहे. विजय माल्ल्या भारतातून फरार आहे. सध्या त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये आहे. ब्रिटन हायकोर्टाने दिलेल्या निकालामुळे आता भारतातील बँका त्याची संपत्ती जप्त करु शकतात.
अधिक वाचा
भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील लंडन हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कर्ज बुडविल्याप्रकरणी मल्ल्यास दिवाळखोर घोषित करावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली होती. हायकोर्टाने त्याला दिवाळखोर घोषित केले असले तरी या निकालाला आव्हान देण्याची संधी त्याच्याकडे आहे. लवकरच त्याचे वकील या निकालास आव्हान देतील, असे मानले जात आहे.
अधिक वाचा
लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्याच्या नावावरील शेअर जप्त केले होते. त्याची विक्री करण्याची परवानगी बँकांना देण्यात आली होती. जुलै २०२१ मध्ये कर्ज देणार्या बँकांनी मल्ल्याच्या नावावरील ७९२.१२ कोटी रुपयांच्या त्या शेअरची विक्री केली होती.
माल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्स सेवेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया व अन्य बँकांकडून ९ हजार ९९० रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र किंगफिशर एअरलाईन्स कंपनीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली. त्यामुळे मल्ल्याने कर्ज परत करण्यास असमर्थता दर्शवली. मात्र त्याने बँकांचे घेतलेले कर्ज दुसरी मालमत्ता घेण्यासाठी वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले.
माल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर ठरवले आहे. सध्या त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये आहे.
ब्रिटन हायकोर्टाने दिलेल्या निकालामुळे आता भारतातील बँका त्याची संपत्ती जप्त करु शकतात.
त्याची संपत्ती जप्त करता यावी यासाठी त्याला दिवाळखाेर घाेषित करण्यात यावे, अशी मागणी बँकांनी आपल्या याचिकेतून केली हाेती.
हेही वाचलं का ?