आंतरराष्ट्रीय

द्वेष संपेल, हुकूमशहा मरतील!

backup backup

कीव्ह/मॉस्को ः वृत्तसंस्था माणसा-माणसांतील द्वेष संपुष्टात येईल, हुकूमशहा मरून जातील, असा विश्वास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी फ्रान्समध्ये सुरू झालेल्या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आभासी पद्धतीने संबोधन करताना व्यक्त केला. त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर निशाणा साधला.

नव्या चार्ली चॅप्लिनची गरज ः झेलेन्स्की

झेलेन्स्की यांनी चित्रपट निर्मात्यांना फॅसिझमवर विनोदी चित्रपट बनवण्याचे आवाहन केले. चॅर्ली चॅप्लिन यांनी साकारलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटरलच्या भूमिकेचे कौतुक करत त्यांनी आम्हाला एका नव्या चॅप्लिनची गरज आहे, जो सांगू शकेल की आमच्या वेळेचा सिनेमा मौन बाळगून नाही. दरम्यान, युरोपमधील फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटो या संघटनेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केला. यापूर्वीच फिनलँडच्या संसदेत सरकारने याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावेळी प्रस्तावावर मतदानात 200 पैकी 188 खासदारांनी 'नाटो'मध्ये सहभागी होण्यास पाठिंबा दर्शविला होता.

युक्रेनच्या रुग्णालयांवर 226 हल्ले

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाने युक्रेनच्या आरोग्य सुविधांवर 226 हून अधिक हल्ले केले आहेत. म्हणजेच दररोज तीन हल्ले. यात 75 मृत्यू झाले असून 59 जखमी झाल्याचीही माहिती आहे.

युक्रेनला पाठिंबा दिल्याने रशियन हॅकर्सचा कोस्टारिकावर सायबर हल्ला

जर्मनीची ऊर्जा
आत्मनिर्भरतेसाठी तयारी सुरू

जर्मनी युक्रेनला देणार
15 कोटी युरोंचे कर्ज

इस्रायलचा दूतावास
कीव्हमध्ये परतला

पुतीन यांच्यासह रशियन सरकारमधील एक हजार सदस्यांना प्रवेशबंदीची तयारी कॅनडाने केली आहे. याबाबतचे विधेयक सिनेटमध्ये सादर केले आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT