कराची; पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानमधील बस बॉम्बस्फोटात चीनचे कामगार ठार होण्याची घटना ताजी असतानाच कराची मध्ये आज (दि. २८) चीनी नागरिकाच्या कारवर अज्ञातांनी अंदाधूंद गोळीबार केला. कराची मध्ये झालेल्या हल्ल्यात चीनी नागरिक गंभीर जखमी झाला आहे.
१४ जुलै २०२१ रोजी पाकिस्तानमधील बस बॉम्बस्फोटात चीनच्या ९ नागरिकांसह १३ जण ठार झाले होते. चीनमधील अभियंते , भूमि सर्वेक्षण अधिकारी आणि तंत्रज्ञ हे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दासू धरणाच्या बांधकामावर जात असताना बसमध्ये स्फोट झाला होता. मृतांमध्ये पाकिस्तान सुरक्षा दलाचे दोन कर्मचार्यांचाही समावेश होता.
बुधवारी कराची मध्ये चीनचा नागरिक कारमधून जात होता. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी या कारवर अंदाधूंद गोळीबार केला.यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चीनचा नागरिक गंभीर जखमी झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.बस बॉम्बस्फोटाची गंभीर दखल चीनने घेतली होती.
पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानमधील चीनी नागरिक टार्गेट झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचलं का ?