woman donates kidney to boss gets fired: सोशल मीडियावर सध्या एक जुने प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे. ही गोष्ट अमेरिकेतली अून एक महिला कर्माचीर डेबी स्टीव्हन्सने आपल्या बॉसचा जीव वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली होती. तिला वाटलं की असं केल्यामुळं तिचं आणि बॉसचं नातं चांगले राहील.
मात्र काही महिन्यात नेमकं उलटं झालं. बॉसने तिला काही महिन्यांनी ती खूप सुट्ट्या घेते म्हणून नोकरीवरून काढून टाकलं. बॉसच्या या निर्णयामुळं ती महिला कर्मचारी खूप हैराण झाली. शेवटी तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
दावा केला जात आहे की डेबी स्टीव्हन्सची किडनी बॉसच्या किडनीशी मॅच झाली नव्हती. त्यानंतर देखील तिने माघार न घेता पेयर्ड एक्सचेंड प्रोग्राममध्ये भाग घेतला. या प्रोग्राममध्ये किडनी डोनर आपली किडनी कोणत्यातरी दुसऱ्या रूग्णाला देतो. ज्या रूग्णाला ही किडनी मॅच होते त्याला ती दिली जाते. अशाच प्रकारे डेबीच्या बॉसला मॅच होणारी दुसरी किडनी मिळाली होती. याच प्रकारे डेबीने आपल्या बॉसचा जीव वाचवला होता.
किडनी डोनेट केल्यानंतर काही महिन्यांनी डेबीची प्रकृती बिघडली होती. तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळं तिला सतत सुट्ट्या घ्याव्या लागल्या होत्या. या काळात ऑफिसमध्ये तिच्यासोबत चांगले वर्तन झाले नाही.
डेबीने आरोप केला की त्यांच्या बॉसने त्यांच्या रिकव्हरी प्रोसेसवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दावा केला होता की सुट्टी घेण्यावरून बॉसने तो विषय खूपच ताणला. त्यांनी पुढे आरोप केला की त्यांना गरजेच्यावेळी सुट्टी देताना त्रास देण्यात आला. त्यांच्या बॉसने डेबी यांना तुम्ही खूप सुट्टी घेता त्यामुळं तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे असं सांगितलं.
मात्र यानंतर डेबीने याची तक्रार कंपनीच्या मॅनेजरकडे केली त्यावेळी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. डेबीने हार न मानता कोर्टाचा दरवाजा ठोठावला. कोर्टात हा वाद अनेक वर्षे चालला. मात्र अखेर दोन्ही गटांमध्ये गोपनीय सेटलमेंट झाली. त्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आलं.