Viral lottery story | अंतर्मनाचा आवाज ऐकला अन् नशीब फळफळलं!

5 डॉलरच्या तिकिटाने जिंकले 92 लाखांचे बक्षीस
Viral lottery story
Viral lottery story | अंतर्मनाचा आवाज ऐकला अन् नशीब फळफळलं!
Published on
Updated on

टोंटीटाऊन (अमेरिका) : कधीकधी आपल्या मनात येणारी एखादी छोटीशी शंका किंवा हुक्की आपले आयुष्य बदलून टाकू शकते. अमेरिकेतील अर्कांसास राज्यातील एका व्यक्तीच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. केवळ अंतर्मनाचा आवाज ऐकून विकत घेतलेल्या एका लॉटरी तिकिटाने या व्यक्तीला रातोरात करोडपती बनवले आहे. टोंटीटाऊन येथे राहणारे थॉमस मॅकॉली हे आपल्या दुपारच्या जेवणावरून कामावर परतत होते. वाटेत त्यांना अचानक एक लॉटरी तिकीट विकत घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी टोंटीटाऊन झेड-मार्टमध्ये गाडी थांबवली आणि फायरी 5 नावाचे 5 डॉलरचे स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केले.

“जणू तिकीट माझ्याशी बोलत होतं!”

थॉमस यांनी लॉटरी अधिकार्‍यांना सांगितले की, “मला फक्त एक अनामिक ओढ वाटली. जणू काही ते तिकीट माझ्याशी बोलत होतं आणि मला ते घ्यायला सांगत होतं.” थॉमस यांनी जेव्हा तिकीट स्क्रॅच करायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्याच रांगेत त्यांना एक लाख डॉलर्सचे (सुमारे 92 लाख रुपये) पहिले बक्षीस दिसले.“हे खरं असूच शकत नाही, असा विचार माझ्या मनात आला. हे बक्षीस जिंकल्यानंतर पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं,” असं थॉमस यांनी हसत हसत सांगितलं.

विजेत्या रकमेचे काय करणार?

अनेकांना लॉटरी लागली की, ते स्वतःसाठी चैनीच्या वस्तू खरेदी करतात. मात्र, थॉमस यांनी जिंकलेल्या पैशांचा वापर एका उदात्त कामासाठी करण्याचे ठरवले आहे. थॉमस यांनी सांगितले की, ते या पैशांमधून आपल्या सासूबाईंसाठी व्हिलचेअर एक्सेसिबल म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवास करता येईल अशी खास गाडी खरेदी करणार आहेत. उर्वरित रक्कम ते कुटुंबाच्या भविष्यासाठी खर्च करतील.

थॉमस यांनी जेव्हा ही बातमी आपल्या पत्नीला आणि कुटुंबाला सांगितली, तेव्हा सुरुवातीला कोणाचाही यावर विश्वास बसला नाही; पण जेव्हा त्यांनी ते विजयी तिकीट दाखवलं, तेव्हा सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news